
वार्षिक उन्हाळी सहल २०२६
दिनांक
शनिवार, २९ ऑगस्ट २०२६
वेळ
दुपारी ४ ते संध्याकाळी ८ पर्यंत
स्थळ
Augarten, Vienna
सहभागी
केवळ महाराष्ट्र मंडळ ऑस्ट्रियाच्या सदस्यांसाठी
कार्यक्रमाबद्दल
नमस्कार मंडळी, जूनच्या अखेरीस आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे आपल्याला आपली वार्षिक सहल पुढे ढकलावी लागली होती. ☀️🥵 मात्र आता, मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वी, कॉलेजचं नवीन सत्र सुरू होण्यापूर्वी आणि उन्हाळा संपण्यापूर्वी सगळ्यांसोबत धमाल, मजा, मस्ती करायची वेळ आली आहे! 😃🎉 यंदाची आपली वार्षिक उन्हाळी सहल आता Augarten येथे आयोजित करण्यात येत आहे. खेळ, मनोरंजन, गप्पा-गोष्टी, स्वादिष्ट अल्पोपहार आणि आपल्या मंडळींसोबतचा निवांत दिवस — हे सगळं अनुभवण्यासाठी नक्की या! 🥳🍽️
महत्त्वाच्या सूचना
- •📌 कृपया नोंद घ्या: ही सहल केवळ महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांसाठी आयोजित करण्यात येत आहे.
- •जूनमध्ये झालेल्या नोंदणीच्या वेळी ज्यांनी सहलीसाठी आपली नावं नोंदवली आहेत, त्यांनी पुन्हा नाव नोंदवण्याची गरज नाही. 🙌
- •आधी नोंदणी करूनही आता सहलीला येणे शक्य नसल्यास कृपया आम्हाला कळवा, त्यामुळे खानपान आणि इतर व्यवस्थेचे नियोजन अधिक व्यवस्थित करता येईल. 🙏
- •ज्यांनी यापूर्वी नोंदणी केली नव्हती आणि आता सहभागी होऊ इच्छितात, त्यांच्यासाठी खालील नोंदणीचा फॉर्म दिला आहे.
Google Form नोंदणी: https://forms.gle/26xU6b2HnFXyVbGA6
आपल्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहोत. 😊 महाराष्ट्र मंडळ ऑस्ट्रिया 🌿
